राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी भाजपला पुण्यात मोठा धक्का दिला आहे.. भाजपचे पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहेत.. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकीता पाटील यांनी त्यांची भेट घेतली.. त्यात पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार सात तारखेला इंदापूरमध्ये मेळावा घेणार आहे. त्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत दाखल होणार की काय? हे येत्या एक, दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. परंतु इंदापूरमधून शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील असणार आहे, असे म्हटले जात आहे. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी दहा वाजता इंदापूरमध्ये पत्रकार परिषद ठेवली आहे. त्यात ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान . हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी देखील तुतारीचे स्टेटस ठेवले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत आता मिळाले आहे.
गेल्या लोकसभेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाला घवघवीत यश मिळाले होते. या यशानंतर आता विधानसभेसाठी शरद पवार गड जोमाने तयारीला लागला असून पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीचं हर्षवर्धन पाटील यांनीही पितृपक्षानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करु, असे म्हटले होते. त्यानंतर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशीच हर्षवर्धन पाटील त्यांची कन्या अंकीता पाटील यांच्यासह शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी पोहचले. त्या ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. या चर्चेच्या वेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.