राजमुद्रा : भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगनारणौतच्यायांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. कंगनां यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने केलेल्या सोशल मीडियावरील कमेंटमुळे त्या चांगल्याच अडचणीत येणार आहेत. त्यांनी बुधवारी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल पोस्ट लिहिली होती. शास्त्रींना त्यांच्या 120 व्या जयंतीदिनी एका पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहताना त्यांनी महात्मा गांधींना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटल आहे.
देश के पिता नहीं, देश के तो लाल होते है. धन्य है भारत मा के ये लाल” असा आशय कंगना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केला होता. फॉलो-अप पोस्टमध्ये, कंगना यांनी देशात स्वच्छतेचा गांधींचा वारसा पुढे नेण्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं होतं.
शास्त्री आणि गांधी यांच्यावरील पोस्टमुळे हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार असलेल्या कंगना रणैत यांच्यासाठी आणखी एक वादग्रस्त विधान ठरलं आहे. यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी रणौत यांच्यावर गांधींवरील “असंवेदनशील उपहास” केल्याबद्दल टीका कinstag दरम्यान याआधी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दलही कंगना यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर भाजपा खासदार असलेल्या कंगना यांना तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता.
कंगना यांनी लाल बहादूर शास्त्रींना त्यांच्या 120 व्या जयंतीदिनी एका पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली, ज्यामध्ये राष्ट्रपिता म्हणून गांधींचा दर्जा कमी लेखल्याचं दिसून आलं. यावरून त्यांना आता तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागणार आहे.. या पार्श्वभूमीवरच आता पंजाबमधील भाजपचे ज्येष्ठ नेते मनोरंजन कालिया यांनीही राणौत यांच्या लेटेस्ट वक्तव्यावर टीका केली आहे.कंगना रणौत यांनी गांधीजींच्या 155 व्या जयंतीनिमित्त केलेल्या कमेंटचा निषेध करतो. तिच्या छोट्या राजकीय कारकिर्दीत तिला वादग्रस्त विधाने करण्याची सवय लागली आहे,” असे कालिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.