राजमुद्रा : गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. या अनुषंगाने केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणार आहे.. दरम्यान सरकारकडून मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले असे ते म्हणाले.. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो”, मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! असे ते म्हणाले..दरम्यान या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.. ते म्हणाले मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा जो निर्णय आहे त्याला खरंतर उशीर झाला पण तरीही तो निर्णय झाला याचा आनंद आहे त्याबद्दल मी केंद्र सरकारच अभिनंदन करतो.. माझ्यासारखी अनेक सहकारी ज्यांना या सगळ्या प्रकरणांमध्ये आस्था आहे आम्ही सुद्धा व्यक्तीगत पातळीवर केंद्र सरकारची मागणी करत यासंदर्भात आग्रह व पाठपुरावा केला होता.. या मागणीसाठी साहित्याच्या क्षेत्रातील सर्वांनी पाठपुरावाही केला होता असे ते म्हणाले.