राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली असून यासाठी त्यांनी विभागणीहाय दौरे सुरू केले आहेत.. मराठवाडा विदर्भनंतर आता त्यांनी नाशिकमध्ये लक्ष घातले असून उद्यापासून दोन दिवस राज ठाकरे नाशिक (Nashik News) दौऱ्यावर येणार आहेत.. विधानसभेच्या अनुषंगानेचं ते उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.
मनसेची स्थापना झाल्यानंतर सर्वाधिक तीन आमदार नाशिक मधून निवडून आले होते त्यामुळे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला झाला होता.. मात्र गटबाजीमुळे मनसेला मोठा धक्का बसला आणि मनसेची सत्ता गेली.. आता आगामी विधानसभेत पुन्हा मनसेने आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे.. त्यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी पक्षाच्या नेत्यांकडून सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात एकूण 47 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आता या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..राज ठाकरेंच्या दौऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
दरम्यान विधानसभेच्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका नाशिकमध्ये होणार आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) स्वबळावर लढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील अडीचशे मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंकडून चाचपणी केली जात आहे.