(राजमुद्रा जळगाव) जळगाव शहरात एकूण 19 प्रभाग असून प्रत्येक प्रभागात स्वतंत्र लसीकरण सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय आणि नियमांचे उल्लंघन रोखण्याची मागणी शिवाजीनगर प्रभागाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे. लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन या गर्दीत एखादा कोरोना रुग्ण असल्यास इतरांना कोरोनाची लग्न झाली तर याला जबाबदार कोण राहील असा सवालही त्यानी केला आहे.
शिवाजीनगर येथील डी बी जैन रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून या ठिकाणी नागरिक भल्या पहाटेपासून गर्दी करत आहेत. या ठिकणी या नागरिकांची अधिक गैरसोय होत असून पाण्याचे पाणी व स्वच्छतागृहाचाही अभाव दिसून येत आहे. लवकर लस मिळावी या आशेने वृद्ध नागरिक सकाळी चार वाजेपासून रांगा लावून बसून राहतात. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी रुग्णालय प्रशासनाला कमी मनुष्यबळ असल्याने आवरणे कठीण जात आहे. त्यामुळे वृद्धांची तसेच इतर नागरिकांची गैरसोय होत असून ही बाब प्रशासनाने लक्षात घेऊन प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांची मागणी शिवाजी नगरचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे.
शहरात एकूण 19 प्रभाग असून प्रत्येक 19 प्रभागांमध्ये स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही व लसीकरण शांततेत पार पडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल सोबतच कुठल्याही प्रकारचा गोंधळ न उडता नागरिकांचा त्रास कमी करता येईल अशी माहिती नगरसेवक दारकुंडे यांनी दिली.