राजमुद्रा : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे आणि प्रतिदावे होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टिकेला आता शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे..अमित शहा सध्या काही बोलत असतात,देशाचा गृहमंत्री भाषण काय करतोय? तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखायचं हेच आपले लक्ष असे ते सांगत असतात. त्यांनी कायदा व सुव्यवस्था कुठे नेऊन ठेवली असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित करत त्यांना चांगलाच पलटवार दिला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते.. या दौऱ्यावर बोलताना त्यांनी आपले लक्ष शरद पवारांना रोखाच आहे उद्धवजींनी आपल्या सोबत गद्दारी केली तर त्यांना रोखायचा आपलं लक्ष आहे..काँग्रेस पक्षाला रोखून खाली ओढायच आहे असं त्यांनी म्हटलं होतं.त्यांच्या या दौऱ्यावर बोलताना शरद पवारांनी माध्यमांची फिरकी घेतली…अमित शहा यांची सासरवाडी कोल्हापूर असल्याने सारखे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असावेत असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला..
दरम्यान सत्ताधारी सरकारने चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून बोलताना शरद पवार म्हणाले, सरकारने लाडकी लेक योजना काढली या योजनाची सर्वांना स्वागत केले पण मुलींवर वाढलेले अत्याचार किती गंभीर आहेत या योजनेतून तिला अर्थ साहाय्य करायचं तर दुसरीकडे तिच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करायचं हे सरकारचं चालू आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला..
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. लोकसभेतील यशानंतर शरद पवार गटात येणाऱ्या पक्षातील नेत्यांची संख्या वाढत चालली आहे..