राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सामना रंगणार असून दोन्हीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यांमध्ये प्रचारांचा अक्षरशा धुरळा उडणार आहे.. देशातील दोन बडे नेते आज महाराष्ट्रात येणार असून बैठकांचा सपाटा लावला जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबई मेट्रो- 3 चं मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात येण्याला वेगळं महत्व आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत असणार आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईत मेट्रो -3 चं आज लोकार्पण केलं जाणार आहे. तसंच इतर काही विकासकामांचं लोकार्पण केलं जाणार आहे. तसंच वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरही मोदी जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते.. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा कालचा दौरा रद्द झाला आज ते कोल्हापुरात असणार आहेत.
कोल्हापूरच्या कसबा- बावडा येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. पुतळा परिसरात कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. पुतळा परिसरात भव्य स्टेज उभारण्यात आलं आहे. पुतळा अनावरणानंतर राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. संविधान सन्मान कार्यक्रमाला राहुल गांधी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.. दरम्यान विधानसभा निवडणुकीआधी या दोन बड्या नेत्यांचे महाराष्ट्रातील दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत..