राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित दादांची राष्ट्रवादी जोमाने मैदानात उतरली आहे. या निवडणुकीसाठी दौरे, सभा भेटीसाठी यांना चांगलाच वेग आला असून काल पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांना वयावरून पुन्हा टोला लगावला आहे..वडील सत्तरी पार केल्यावर आपल्या डोळ्यांदेखत मुलावर जबाबदारी सोपवतो. मात्र, काहीजण ऐकतच नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना उद्देशून वक्तव्य केलं आहे.
तसेच चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचेही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतचं राहायचं. असा प्रश्न उपस्थित करत, अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.. आता या टीकेला शरद पवार काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षातील नेत्यांच्या बैठकांचा धडाका वाढत चालला आहे.. या निवडणुकीबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी येत्या आठ ते दहा दिवसांत आचारसंहिता लागू होईल आणि पस्तीस दिवसांनी मतदान होईल, असं म्हणत विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघातील ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल तेव्हा हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा, असं आवाहन ही अजित पवारांनी यावेळी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सामना रंगणार असून निवडणुका तोंडावर आल्या तरी काही मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही..
दरम्यान महायुतीमध्ये मावळच्या मतदार संघासाठी रस्सीखेच सुरू आहे.. अजूनही मावळमध्ये महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये मावळच्या मतदारसंघासाठी (Maval Vidhan Sabha) रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान गेल्या लोकसभेत महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगलाच फटका दिला होता.. मात्र आगामी निवडणुकीत हा फटका भरून काढण्यासाठी महायुती जोमाने कामाला लागली आहे.
दरम्यान दुसरीकडे गेल्या लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आणि राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले आहेत.. या विधानसभेसाठी त्यांनी आखा महाराष्ट्र पिजून काढण्याचा निर्धार केला असून या विधानसभेची ते बाजी मारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.