राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना महाराष्ट्रात तीन मुद्द्यांनी राजकारण तापलं आहे. त्याच तीन मुद्यांना आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी हात घातला आहे..यावेळी त्यांनी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार , जातीनिहाय जनगणना करणार आणि सोशिओ इकॅानॅामिक सर्व्हे करणार अशा तीन मोठया घोषणा केल्या आहेत.. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस अधिक आक्रमक पद्धतीने हे तीन मुद्दे मांडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप संविेधान बदलणार असल्याचा मुद्दा महाविकास आघाडीने लावून धरला होता. त्यामुळे राजकारण ढवळून निघालं होतं. आता या तीन मुद्द्यांवर महाविकास आघाडी राजकारण ढवळून काढण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता दिसून येत आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे .. ते म्हणाले, जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणारच राज्य सभा आणि लोकसभेत मंजूर करून घेणार. आम्ही कायदा करणार. मोदी असो की भाजप कोणीही रोखू शकणार नाही. या दोन गोष्टी केल्यावरच खरं राजकारण सुरू होईल. जातीनिहाय जनगणना सुरू झाली तर सर्व डेटा आपल्या हाती असेल, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे..दरम्यान आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यात राजकारण तापलेलं आहे. त्यातच विधानसभा निवडणुका आता अगदी तोंडावर आलेल्या असताना हा मुद्दा आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी बोलताना संविधान संरक्षणावर अधिक भर दिला ,, आपल्याला संविधानाचे संरक्षण करायचं आहे कारण संविधान गेलं तर सर्व काही गेलं..भाजप आणि संघाने सर्व रस्ते बंद केले आहेत. आपल्याला रस्ते उघडायचे आहेत, मोदी आधी 400 पार म्हणत होते, हसत होते. 56इंचाची छाती होती. त्यानंतर देशातील जनतेने एक शब्दही न सांगता, संविधानाला तुम्ही हात लावला तर बघा काय होतं, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दाखवू दिलं.. असा टोला देखील त्यांनी लगावला.