राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारंवार महाराष्ट्र दौरे होत आहेत.. त्यांच्या या दोऱ्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की,देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात यश मिळणे त्यांना आता कठीण वाटत आहे. फडणवीस यांची नकारात्मक भाजपला बुडवेल की काय? असं त्यांना वाटतं आहे. म्हणून सारखे पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात दौऱ्यावर येत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला (BJP) फटका बसल्यानंतर आता भाजप अलर्ट मोडवर आलाय. वारंवार भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.. यावरूनच भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास वाटत नाही,
त्यामुळे स्वत: प्रचार जातीने पाहावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष द्यावं लागतं आहे. पंतप्रधान मोदींना सातत्याने राज्यात यावं लागतंय. याकडे आम्ही सकारात्मकरित्या बघत आहोत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मराठी भाषेला अभिषेक दर्जा देण्याचा निर्णय घेतला. यावरून बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या मोठेपणा मिळवायचा असेल तर आधी मराठी शाळा वाचवा..कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सह्यांची मोहीम राबवली होती. राष्ट्रपतींना यासंदर्भात सह्या दिल्या होत्या. शिवसेनेच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. सरकारकडून काय अपेक्षा आहे. , असा हल्लबोल त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.