राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार जोमाने तयारीला लागले असून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी नवी खेळी केली आहे. कारण महायुतीमधील आणखी एक सामर्थ्यवान नेता शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.. त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे.. कारण अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात (Sharad Pawar Camp) प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आजच रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीत बंड करून महायुतीसोबत गेलेल्या अजित पवार यांना शरद पवार यांनी चांगलाच धक्का दिला आहे.. दरम्यान रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांच्याच कलाने निर्णय घेतील, अशी माहिती आहे. परंतु, रामराजे नाईक निंबाळकर यांनी घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची माहिती आहे. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) देखील अजित पवार यांची साथ सोडतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना चांगला धक्का बसणार आहे.
दरम्यान आगामी विधानसभेच्या अनुषंगाने अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल. दरम्यान कालच भाजपचे इंदापूर मतदारसंघातील नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता. हा भाजप आणि अजित पवार गट दोघांसाठी मोठा धक्का ठरला होता. त्यानंतर आता महायुतीतील सामर्थ्यवान नेता शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे चर्चांना उधाण आला आहे.