राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने शिंदे यांच्या शिवसेनेला चांगला धक्का दिला आहे..शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर शिवसेनेचा युवा चेहरा असलेले दीपेश म्हात्रे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासोबत गेले होते, युवासेना सचिवपदी ते शिवसेनेत काम करत होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील हा युवा चेहरा ठाकरेंकडे येत धनुष्यबाणाला रामराम करून ठाकरेंचीं मशाल हाती घेणार आहेत. त्यामुळे डोंबिवली शहरात शिंदेच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडल आहे.
शिवसेना युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे आज आपल्यासोबत कल्याण-डोंबिवली महापालिकेमधील चार माजी नगरसेवकांसह आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.आज दुपारी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी दीपेश म्हात्रे तयारी करत असून, ते इच्छुक उमेदवार असल्याचं सांगण्यात येतंय, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना डोंबिवलीतून उमेदवारी मिळते का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट जोमाने तयारीला लागला असून या निवडणुकीसाठी त्यांनी मोठी रणनीती आखली आहे..दरम्यान दुसरीकडे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे लागले आहे. शिवसेनेत फूट पडण्याआधी दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडत होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदा कुणाचा दसरा मेळावा गाजणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.