राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.. या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक रिंगणात उतरले आहेत.. या पार्श्वभूमीवरच आता माळशिरस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उत्तम जानकर (Uttam Jankar)इच्छुक आहेत. पण त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ( Malshiras Assembly Constituency 2024) अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीने निवडणुक लढविणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून दोन्हीकडून प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चाचणी करण्यात येत आहे.. दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघात अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांला महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी माळशिरस येथे अनुसूचित जाती जमातीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निर्धार मेळाव्यात करण्यात आली आहे.. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या उत्तम जानकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात.. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बेधकड बोलणाऱ्या उत्तम जानकर यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाकरिता विशेष निरीक्षकपदी निुयक्त करण्यात आले आहे. मात्र अनुसूचित जाती समिती जर रिंगणात उतरलीतर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकरांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.