राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण बारामती जो उमेदवार देऊ त्याला निवडून द्या असं सांगत बारामती मधून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिलं होतं.. त्यानंतर ते कुठून निवडणूक लढणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला असताना आता सस्पेन्स वाढत चालला आहे..अजित पवार हे यंदा बारामतीमधून नव्हे तर शिरूरमधून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे अजित पवार शिरूरमधूनच निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. म्हणून भाजपने या मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नाहीत. एक प्रकारे शिरूर मतदारसंघ हा अजित पवारांना सोडणार असल्याच्या चर्चा असून मात्र त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झालेत..दरम्यान लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना जागावाटपावरून महायुती आणि महाविकासाकडे मध्ये चर्चा चालू आहेत.. मात्र पुणे जिल्ह्यातील शिरूर हा मतदारसंघ भाजपाकडे आहे तरी तेथे अद्याप कोणत्याही उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची चर्चा आहे. पण अजित पवार गटाकडे सध्या तगडा उमेदवार नाही, त्यामुळे खुद्द अजित पवार हेच या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे नाव पुढे आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.