राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेवल्या असताना महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता महायुतीतील शिवसेनेचे प्रवक्ते अनिल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट त्यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्ट्राईक रेट प्रचंड वाढला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेचं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत, असे त्यांनी म्हटले आहे..
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही पेचं निर्माण झाला आहे.
विधानसभेसाठी आम्ही किती जागा मागणार यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. कारण मी जर आकडा सांगितला, तर मग वाचाळवीरांना आवरा, अशी टीका माझ्यावर होऊ शकते. त्यामुळे मी आकडा सांगणार नाही”, असे संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचा वक्तव्य वारंवार संजय शिरसाठ यांनी केल आहे.
यंदाच्या विधानसभेत २०-२५ अपक्ष आमदार मुख्यमंत्रीपदाची दोर घेऊ शकतात. जर समीकरण वर खाली गेले तर पण सध्या महायुती जोरात आहे. महाविकासाआघाडीचं काही खरं नाही, त्यांची युती होणार की नाही, माहीत नाही. असेही ते म्हणाले.. दरम्यान महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात वारंवार चर्चा होत असते.. त्यामुळे एकनाथ शिंदेच हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचं महायुतिकडून कडून सांगण्यात येत असतं.. दरम्यान आगामी विधानसभेत महायुती बाजी मारणार का हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.