राजमुद्रा : गेल्या अनेक दशकापासून खलेश्वर मंदिर चोपडा रोड आणि ताडे पुरा येथील कंजरभाट समाज वास्तव्यास राहत आहे.. मात्र तरी देखील या समाजाला हक्काची स्मशानभूमी मिळाली नाही.. त्यामुळे ती मिळावी यासाठी कंजरभाट युवाशक्ती बहु उद्देशिय संस्थे मार्फत मा. तहसीलदार आणि अमळनेर नगरपालिकाचे मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या 50 वर्षा पासून कंजरभाट समाज नदीच्या काठाशी अंतविधी करत आहे.अश्या वेळी अनेक वेळा नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांची गैरसोय होत आहे त्या अनुषंगाने या समाजाला न्याय मिळावा तसेच त्यांना हक्काची स्मशानभूमी मिळाली पाहिजे असं निवेदन आज देण्यात आले.