राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून शहरात जास्त प्रमाणात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवरच जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेडी यांनी शहरातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा यांना दिले आहेत.
त्यांच्या या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, विजयसिग पाटील, पोह महेश गजानन, सुधाकर अंभोरे, महेश महाजन,अकरम शेख,लक्ष्मण पाटील,राहुल पाटील,जितेंद्र पाटील,भूषण पाटील रंणजीत जाधव दीपक चौधरी अशा सर्वांचे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पथक तयार करण्यात आले.
शहरातील वारंवार होणाऱ्या मोटरसायकलीच्या चोरीची माहिती गुप्त बातमीदार तर्फे वरील पथकातील अंमलदार यांना मिळाली होती. यानुसार रवींद्र उर्फ राहुल पाटील व दीपक ज्ञानेश्वर पाटील हे सोबत मोटरसायकल चोरी करून वापरत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथक बरेच दिवसापासून त्याच्या मागावर होते. त्यांनी मोठ्या सीताफिने त्यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.. तसेच त्यांच्यावर जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरित चार मोटरसायकल या पुणे व मुंबईतून चोरी केल्याचे सांगितल्याने त्याबाबत सध्या शोध सुरू आहे..
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे