राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सुद्धा महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू आहे..या निवडणुकीतील जागा वाटपामध्ये महायुतीतील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांसह छोट्या पक्षांनाही स्थान देण्यात येणार आहे.. या पार्श्वभूमीवर आता दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे..
महायुती मधील तिन्ही पक्षांची उमेदवार यादी सुद्धा एकत्रित रित्या जाहीर करण्यात येणार आहे.. या पहिल्या यादीत जास्तीत जास्त उमेदवारांचा समावेश करण्यात येणार आहे.दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांची बैठक झाली. राजधानी दिल्लीतल्या विज्ञान भवनात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यावर जागा वाटपावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आता उमेदवार जाहीर होणार असल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..
गेल्या लोकसभेत महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगलाच फटका दिला होता.दरम्यान महायुतिकडून उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाल्यामुळे काही जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. ऐनवेळेस उमेदवारी जाहीर झाल्यामुळे प्रचारास वेळ मिळाला नाही. तोपर्यंत विरोधी उमेदवाराचे प्रचाराचे दोन, तीन टप्पे पूर्ण झाले होते. या पार्श्वभूमीवर आता लोकसभेसारखी परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी महायुती आता चांगलीच अलर्ट मोडवर आली आहे..