राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची चर्चा अजूनही सुरूच आहे.. अद्यापही महायुतीसह महाविकास आघाडीतील जागेचा तिढा सुटला नसून मुंबईतील जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे..मुंबईत विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. मुंबईतील जागा वाटपाचा तिढा देखील अद्याप सुटलेला नाही. भायखळा, वर्सोवा आणि वांद्रे पूर्व या तीन जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं दावा केला आहे. या तीन जागांवरील निर्णय न झाल्यानं मविआचं मुंबईतील जागावाटप अंतिम झालेलं नाही, त्यामुळे हा तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.
मविआतील सूत्रांनुसार घाटकोपर पश्चिम, जोगेश्वरी आणि मागाठाणेचा तिढा लवकर सुटेल असा विश्वास नेत्यांना आहे. मुंबईतील 36 पैकी जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे.तर मुंबईतील भायखळा, वांद्रे पूर्व आणि वर्सोवा या तीन जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही. याशिवाय घाटकोपर पश्चिम, जोगेश्वरी आणि मागाठाणे या जागांबाबत देखील अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे मुंबईतील या जागा कोणाला सुटणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने भायखळा आणि वांद्रे पूर्व मध्ये दावा केला आहे… यादी झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकसंध असताना भायखळा येथून यामिनी जाधव एमआयएमच्या वारिस पठाण यांचा पराभव करुन आमदार झाल्या होत्या. वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी सेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता. वर्सोवाच्या जागेवर भाजपच्या भारती लव्हेकर आमदार आहेत. या तीन जागांवर सेना आणि काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे येथील जागा आता काँग्रेसला सुटणार की ठाकरेंच्या शिवसेनेला याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.