राजमुद्रा : राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील झालेल्या अजित पवार गटाला विधानसभेच्या तोंडावर गळती लागली आहे.. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यांच्या या निर्णयामुळे आता अजित पवार यांना ऐन विधानसभेच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत असून करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी निवडणूक लढवण्याबद्दल भाष्य केला आहे ते म्हणाले शरद पवार हे माझे श्रद्धास्थान आहेत, तर अजित पवार हे माझे नेते आहेत..“मी अपक्ष निवडणूक लढवणार हे माझ्या नेत्यानेच जाहीर केले.. भले मी कोणत्या पक्षात असो किंवा नसो, आमच्या दोघांची विश्वाससार्हता आहे ते एकमेकांना माहिती आहे. मी अपक्ष निवडणूक लढवणार असलो तरीही मी कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवणार याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, असेही संजय मामा शिंदे यांनी सांगितले.. त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवार यांना मोठा शह बसणार आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार जोमाने तयारीला लागले असून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी नवी खेळी केली आहे. त्यांच्या या खेळीने अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत..दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला गळती लागली आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी स्वत: न लढता मुलगा रणजितसिंह यांना लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुलगा रणजितसिंहच्या उमेदवारासाठी शरद पवारांना गळ घातली आहे. त्यांचे बंधू व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे ही आता त्यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढणार आहेत.. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघातून १०० टक्के अपक्ष निवडणूक लढवणार आहे”, असेही संजयमामा शिंदे म्हणाले