राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता बीड मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे..महायुतीत शिवसेनेची जिल्ह्यात एकमेव विधानसभेची जागा असलेल्या बीड मतदारसंघावर (Beed Assembly Constituency 2024) राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. आता यावर शिवसेना काय भूमिका मांडणाऱ्या याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बीडमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप तयारी करीत आहेत. दरम्यान आज शिवसेनेचे नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जिल्हा दौरा आहे. डॉ. शिंदे प्रथमच जिल्ह्यात येत असल्याने जिल्हा प्रमुख अनिल जगताप व सचिन मुळूक यांच्याकडून त्यांच्या मेळाव्याची तयारीही जय्यत सुरु आहे. मात्र, आपल्या पक्षाच्या जागेबाबत डॉ. शिंदे काही ठोस घोषणा करतात का, याकडे लक्ष लागले आहे.एकेकाळी शिवसेना -भाजप युतीत जिल्ह्यात शिवसेना पक्ष मोठा होता..त्यावेळी जिल्ह्यात सात मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ शिवसेनेकडे आणि तीन मतदारसंघ भाजपकडे होते. हळुहळु शिवसेनेच्या एक एक जागा घटत गेल्या.
दरम्यान बीडमधून विजयी झालेले संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र, ज्यांचा आमदार त्यांचा उमेदवार असे समीकरण मांडत आता बीड मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावेदारी केली आहे. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान 2009 च्या विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पुर्वीचा रेणापूर मतदारसंघ लातूर जिल्ह्यात गेला आणि चौसाळा मतदारसंघ नाहीसा झाला. त्यानंतर या युतीत केज, परळी, माजलगाव, आष्टी व गेवराई या पाच विधानसभेच्या जागा भाजपला असायच्या तर बीड विधानसभासभेची जागा शिवसेनेकडे असायची.. आता बीडमधून राष्ट्रवादी की शिवसेना लढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.