राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.. गेल्या काही दिवसापासून पक्षातील नेत्यांची दुसऱ्या पक्षात आउटगोइंग चालू असून या पार्श्वभूमीवरच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी साडेसात वाजता आमदारांचीं महत्त्वाची बैठक होणार आहे..
सध्या अजित पवार गटात नेत्यांचे आऊटगोईंग सुरु असल्याने उपमुख्यमंत्रीअजित पवार हे आमदारांशी संवाद साधणार आहेत.
तसेच जागावाटपाचा फॉर्मुला ही या बैठकीत निश्चित केला जाणार आहे.. या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहावे असे आदेशही त्यांनी दिले आहेत..त्यासोबतच सर्व आमदारांच्या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, याबद्दलचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. यासोबतच या बैठकीत पक्षांतर्गत विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार गट ऍक्टिव्ह मोडवर आला असून प्रत्येक मतदारसंघात त्यांची चाचणी सुरू आहे.. असंच आता पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जात असल्याने निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठा धक्का बसत आहे.. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत आमदारांच्या मनातील विचार, मते जाणून घेण्यात येणार आहेत.. आता या बैठकीचा कितपत फायदा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार जोमाने तयारीला लागले असून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी नवी खेळी केली आहे. त्यांच्या या खेळीने अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत..