राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना नेत्यांचे पक्षातील इन्कमिंग आणि आउटगोइंग वाढत चालले आहे.. या पार्श्वभूमीवरच आता महाशक्ती मध्ये सक्रिय झालेले प्रहारचे बच्चू कडू यांना तोंडावर मोठा धक्का बसला आहे.मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांनी बॅटला रामराम करत हातात धनुष्यबाण हाती घेतला आहे.. यावरून आता प्रहारचे बच्चू कडू यांनी भाजप शिवसेनेवर मोठा आरोप केला आहे..
राजकुमार पटेल यांच प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. अजूनही दोन तीन महत्त्वाचे कार्यकर्ते जे जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट त्यांनीच केला.
आगामी विधानसभेसाठी राजकुमार यांनी घेतलेला निर्णय भाजप शिवसेनेची खेळी असल्याचा त्यांनी म्हटल आहे.. तसेच .राजकुमार पटेल यांनी सांगितलं की दोस्ती कायम राहील तर आम्ही दोस्ती कायम ठेवून राजकुमार पटेल विरोधात उमेदवार देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र याआधी आमदार रवी राणा यांनी प्रहारचे राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गटात बच्चू कडू यांनीच पाठवलं अस म्हटलं होतं.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात साठ गाठ आहे. तर बच्चू कडू यांचीच ही खेळी आहे असा आरोप रवी राणा यांनी केला. त्यामुळे आता राजकुमार पटेल यांच्या उमेदवारीवरून महायुतीतच ठिणगी पडल्याचे दिसून आले आहे.त्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध उमेदवार देऊ असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे..
दरम्यान बच्चू कडू यांनी राज्यात महायुतीचा हात सोडून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग राबवला आहे. त्यातच पटेल हे जवळचे मित्र असले तरी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांनी एक घाव दिला आता आम्ही दहा घाव देऊ असे ते म्हणाले होते. मात्र पटेलचा प्रहार सोडून जाणं म्हणजे भाजप शिवसेनेची खेळी असल्याचा हल्लाबोल आणि आरोप त्यांनी केला आहे.