मुंबई राजमुद्रा वृतसेवा | विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच्या दिवशी प्रचंड गोधळ निर्माण झाला होता यावेळी विरोधक – सत्ताधारी आक्रमक होताना पाहायला मिळाले आहे. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या मुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. ओबीसीच्या मुद्यावर आम्ही सरकार ला उघडे पाडले. त्यामुळं खोटे आरोप लावून आमदारांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप देवेद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी 12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका मांडली आहे. भास्कर जाधव काय बोलले ते सांगणार नाही. सर्व शांत झालेले असताना ही मॅन्यूफॅक्चर्ड कारवाई केलीय असे फडणवीस म्हटले आहे.