राजमुद्रा : चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यात महापुरुषांचे विचार व त्यांचे कार्य याचा जोगवा करण्याचा चंग बांधला आहे. त्यातूनच तालुक्यात महापुरुषांचे स्मारके, त्यांच्या नावाने, चौक, रस्ते , सभामंडप, सभागृहे उभी राहिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सभागृह, अहिल्यादेवी सभागृह, संत सावता सभागृह, वीर एकलव्य भवन, संत सेवालाल भवन या महापुरुषांना बरोबरच तालुक्यातील शहीद जवानांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देखील तालुक्यातील 14 ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन उभारले जाणार आहे. सदर सामाजिक भवन व इतर कामांसाठी शासनाने नुकत्याच रुपये 5 कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सामाजिक भवनातून आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता,न्याय, बंधुता या विचारांच्या शिकवणीचा जोगवा या निमित्ताने होणार आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच चाळीसगाव येथे महाराणा प्रताप यांच्या नावाने उभारलेल्या भव्य चौकाचे लोकार्पण करण्यात आले, त्यानंतर महात्मा ज्तोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 2 कोटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन आदी कामांसाठी ५ कोटी असा भरघोस निधी उपलब्ध केला आहे.
दरम्यान आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय भवन उभारण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होतो, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सामाजिक विकास निधीतून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. बाबासाहेबांचे विचार कायम तेवत ठेवण्यासाठी हे सामाजिक भवन प्रेरणास्थान बनतील, भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे आभार मानले..