राजमुद्रा : राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील झालेल्या अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्क्यावर धक्के बसत आहेत.. गेल्या काही दिवसापूर्वीच अजित पवार गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे.यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा दुहेरी धक्का बसणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून अजित पवार गटातील एकेक पत्ता सुट्टा करण्याचा त्यांनी निर्धारच केला आहे. या पार्श्वभूमीवरच आता अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच यावेळी मोदी बागेतून सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) गाडीत जाताना शिंगणे यांनी आपला चेहरा फाईलने लपवला. त्यामुळे आता अजित पवार यांची साथ सोडून शिंगणे तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला होता. त्यानंतर येत्या १४ तारखेला अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर ही साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.. त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटाला गळती लागले असल्याचे दिसून येत आहे..