राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली असून प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.. अशातच आता त्यांनी एका सभेत बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर रोख ठेवून वक्तव्य केला आहे..शरद पवार यांना सांगूनच मी माझी राजकीय भूमिका घेतली होती’ ते आधी हो बोलले आणि नंतर नाही म्हणाले.. असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन भाग पडले.. त्यानंतर राष्ट्रवादीतील पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू झाली.. या दरम्यानच आता सुरू झाली असून एकीकडे विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागले आहे.. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे..विधानसभेसाठी महायुती असो वा मविआ सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा होत असून बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वात आम्ही सगळी पुढे गेलो आहोत… ‘ मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, ती भूमिका मी साहेबांना सांगूनच घेतली. साहेब पहिल्यांदा हो बोलले, नंतर पुन्हा साहेब म्हणाले मला ते योग्य वाटत नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. असेही ते म्हणाले..‘पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. त्याच्यामुळे काही अडचण नव्हती . पण आता काय दोन पक्ष झाले आहेत. ‘ असं ते म्हणाले. ‘ प्रत्येकाने कुठे ना कुठे थांबावं लागतं’ असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना लगावला
दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनंदा पवार रिंगणात होत्या.. या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक होती, मी ती आधीही मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, असा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला.