राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीचे कोकणात रणांगण तापलं असतानाच आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची अधिक संपर्क साधला होता मात्र त्यांनी चर्चेची दरवाजेच बंद केले होते..तरी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते असा दावा त्यांनी केला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान पाच वर्षांपूर्वी तुटलेल्या शिवसेना भाजप युतीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रयत्न सांगत रामदास कदम म्हणाले, जर का उद्धवजींनी फोन उचलले असते, तर उद्धव ठाकरे तेव्हाच अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले असते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.. तसेच ठाकरे यांना काँग्रेस बरोबर जायचं होत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.मी महाराष्ट्राला सांगेन उद्धव ठाकरे यांचं बेगडी राजकारण चाललं आहे. त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराला पायदळी तुडवले”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
विधानसभेच्या रणधुमाळीत भाजपचा कौतुक करताना रामदास कदम म्हणाले,‘जम्मू-काश्मीर खुलं करण्याचं काम कुणाच्या बापाला जमलं नव्हतं’“जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवणे हे जम्मू-काश्मीर खुलं करण्याचं काम कुणाच्या बापाला जमलं नव्हतं. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.. गेल्या 55 वर्षापासून मी राजकारणात आहे.. राजकारणातील खूप पावसाळी मी पाहिले आहेत..दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जे घडलं ते विधानसभा निवडणुकीत घडणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे.
असे ते म्हणाले.