राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीसह महाविकास आघाडीकडून जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत.. दरम्यान या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी ही मैदानात उतरली असून आज दहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी विधानसभा निवडणुकीच्या दहा उमेदवारांची नावे जाहीर केली विशेष म्हणजे हि सर्वच्या सर्व १० नावे मुस्लिम समाजातील उमेदवारांची आहेत. भाजपची सत्ता काढायाची असेल तर मुस्लिम समाजाकडे सत्ता सोपवावी लागेल या उद्देशाने मुस्लिम समाजातील उमेदवारांना संधी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देताना भटके विमुक्त दलित आणि मुस्लिम समाजाला अधिक प्राधान्य दिले आहे.. दरम्यान वंचितच्या 288 उमेदवारांच्या यादीत मराठा समाजाच्या 18 उमेदवार आहेत मात्र यात एकही ब्राह्मण नाही..या निवडणुकीत 288 जागांवर आपली उमेदवार लढत असल्याचा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.. दरम्यान आता या विधानसभेत वंचित किती बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
वंचित कडून विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली दुसरी यादी —
शहजाद खान सलीम खान, मलकापूर विधानसभा मतदारसंघ
खतीब सय्यद नातिकोद्दीन, बाळापूर विधानसभा मतदारसंघ
सय्यद समी सय्यद साहेबजान, परभणी विधानसभा मतदारसंघ
मो. जावेद मो. इसाक, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ
सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर, गंगापूर विधानसभा मतदारसंघ
अयाज गुलजार मौलवी, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ
अॅड. मोहम्मद अफरोज मुल्ला, हडपसर विधानसभा मतदारसंघ
इम्तियाज जाफर नदाफ, माण विधानसभा मतदारसंघ
आरिफ मोहम्मद अली पटेल, शिरोळ विधानसभा मतदारसंघ
आल्लाउद्दीन हयातचाँद काजी, सांगली विधानसभा मतदारसंघ