राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे शेतातील इलेक्ट्रिक पोल वरील तार चोरीचे प्रमाण वाढले असून त्याबाबतचे गुन्हे उघडकीस आणण्याचे जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेडी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा यांना आदेश दिले आहेत.
त्यांच्या या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे,संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील,भगवान पाटील,राहुल कोळी,विलास गायकवाड, राहुल बैसाणे,गोरख बागुल,भारत पाटील अशा स्थानिक गुन्हा शाखेच्या जळगाव यांचे पथक करण्यात आले.
पथकातील अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळताच कासोदा व एरंडोल शेत शिवारातील इलेक्ट्रिक पोल वरील तार चोरी करणारे इसम एरंडोल शहरात ताब्यात घेण्यात आले.. यामध्ये रवींद्र मिस्तरी, धनराज ठाकूर,,समाधान पाटील यांचा समावेश होता.त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तार चोरी केल्याची कबुली दिली.. त्यानंतर त्यांच्याकडून एक लाख 50 हजार रुपयाची 3800 मीटरची तार हस्तगत करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे