राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी जोमाने कामाला लागली असून जागा वाटपावर गेल्या तीन दिवसापासून आघाडीत चर्चा सुरू आहे अखेर आज महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली असून
गुरुवारी व शुक्रवारी महाविकास आघाडीतील रखडलेल्या जागांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर सर्व जागांवर सुरळीत तोडगा निघाला तर शुक्रवारी (11 ऑक्टोबरला) अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे..
विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा या उद्धव ठाकरे गटाला मिळणार असल्याची माहिती देखील समोर आली असून.. या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला जवळपास 100 जागा तर कॉँग्रेसलाही तितक्याच म्हणजे 100 जागा मिळणार आहेत तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला 88 जागा दिल्या जाणार आहेत. छोट्या मित्र पक्षांना या तीन प्रमुख पक्षांच्या कोट्यातून जाग मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.. दरम्यान आघाडीमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील काही जागांवर एकमत होणे बाकी आहे. या काही अडलेल्या जागेवर एकमत झाल्यानंतर फॉर्म्युला जवळपास फायनल होणार आहे. त्यानंतर लवकरच जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगलाच फटका दिला होता.. दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मास्टर प्लॅन तयार केला असून या निवडणुकीत ही ती महायुतीला शह देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.. आघाडीतील दहा ते पंधरा टक्के जागावर एकमत होणे बाकी आहे आता त्यावर सध्या आघाडीचीं चर्चा सुरू असून तोडगा निघाला की लवकरच जागावाटपाचीं अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..