राजमुद्रा : जळगावच्या पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकार्याला पुण्याच्या सीबीआयने रंगेहात अटक केल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे..आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी पंचवीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जळगावच्या पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकारी रमण वामन पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.. विशेष म्हणजे 22 महिन्यानंतर ते निवृत्त होणार होते तसेच ते भरतीसाठी ही पात्र होते..
लेखाधिकाऱ्याच्या विरुद्ध तक्रार करणारे सचिन माळी यांच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी एक फार्म आहे.ती दोन वर्षापासून बंद असून त्याचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून माळी यांना नोटीस पाठवण्यात आली होती.. मात्र त्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल दिला नसल्यामुळे त्यांची विचारणा केली असता पवार यांनी त्यात काही चुका असल्याच सांगितलं. त्यानंतर मार्च 2023 च्या पीएफच्या पेमेंटमध्ये चूक आहे असे त्यांनी सांगितले.. फार्मच्या पीएफ तक्रारीतील सेटलमेंट साठी सुरुवातीला 50 हजारांची मागणी पवार यांनी केली होती त्यानंतर अखेर तडजोड करत 25 हजार रुपये देण्याचे ठरलं. याप्रकरणी माळी आणि तात्काळ जाऊन पुणे येथील सीबीआय कार्यालयाकडे तक्रार नोंदवली त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि त्यानंतर रमण पवार यांना रंगेहात पकडण्यात आलं. यामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे
रमण पवार यांनी जळगावला येण्यापूर्वी नाशिक,छत्रपती संभाजीनगर येथील पीएफ कार्यालयात सेवा बजावली आहे त्यामुळे त्या काळात त्यांना आयुक्तपदी भरती मिळण्याची शक्यता होती अशी माहिती समोर आली मात्र त्याआधीच त्यांनी लाज घेतल्याच प्रकरण समोर आल्याने त्यांच्या नोकरीवर आता गदा आली आहे.. दरम्यान कारवाईपूर्वी सीबीआयच्या पथकाने घटनास्थळी चाचणी केली..सायंकाळी पीएफ कार्यालयातील दालनात लाचेची रक्कम दिली त्यानंतर पवार बाहेर आपल्या वाहनाजवळ जाताना सीबीआय ने त्यांना अटक केली. घटनेनंतर पवार यांच्या चौकशीचे रेकॉर्डिंग म्हणून पुरावा तयार केला आहे.. यानंतर त्यांना अखेर रंगेहात पकडण्यात आल आहे..