राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना आता महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे..जामनेर येथील भीमसृष्टी आणि शिवसृष्टी अनावरण सोहळ्यातील पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो डावळण्यात आला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महायुतीत सर्वकाही अलबेल नसल्याचा चर्चांना उधाण आलं आहे ..
जामनेर येथील राजमाता जिजाऊ चौक येथे राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून व प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी पुतळ्याचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी पुतळ्याचा अनावरण सोहळा आज सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे.. मात्र यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावासहित त्यांचा फोटोही डावण्यात आल्यामुळे महायुतीतील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे..
गेल्या काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीत सर्वकाही अलबेल नसल्याच दिसून आलं होतं. छत्रपती संभाजी नगरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनर वर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावण्यात आला होता..विशेष म्हणजे त्यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला होता.. परंतु त्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात तो विषय चर्चेचा ठरला होता.. दरम्यान महायुतीत आता तोच वाद पुन्हा एकदा जामनेर येथील लावण्यात आलेल्या पोस्टरवर दिसून आला आहे..