राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील उद्धव ठाकरे यांचा खास शिलेदार पक्ष सोडणार आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष असलेले माऊली आबा कटके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे. त्यांचा पक्ष प्रवेश सोहळाही लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून लवकरच ते विधानसभेच्या रिंगणात ही दिसणार असल्याची चर्चा होत आहे.. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे…
विधानसभेच्या निवडणुका आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता सुरु होणार असल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या घोषणा केल्या जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावण्यात आला. दुसरीकडे महविकास आघाडीतील नेत्यांवर महायुतीने लक्ष ठेवले आहे. आता या पार्श्वभूमीवरच अजित पवार गटात ठाकरेंच्या शिलेदाराचा पक्षप्रवेश होणार असल्यामुळे आघाडीसाठी हा धक्का मानला जात आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उबाठा गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटके अजित पवारांचे घड्याळ हाती घेणार आहे. त्यानंतर शिरुर विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. शरद पवार गटाचे विद्यामान आमदार अशोक पवार यांच्या पुढे आव्हान उभे करण्यासाठी उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटके यांना मैदानात उतरवले जाणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीने लढत होणार असल्याचे दिसून येत आहे… दरम्यान माऊली आबा कटके यांचे २००९ ते २०१४ आणि त्यानंतर २०१९ पासून वर्चस्व या मतदार संघावर आहे. ते मोडीत काढण्यासाठी माऊली आबा कटके यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे.