राजमुद्रा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दसरा हा खूप महत्त्वाचा असल्याचा सांगत महाराष्ट्राचे लक्ष वेधलं आहे. आज त्यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.
“दसऱ्याच्या शुभेच्या देताच, आता बेसाधव राहून महाराष्ट्र घडणार नाही, असे सांगत महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आपण आपट्याची पानं वाटतोय. आता शमी झाडावरची शस्त्र उतरवण्याची वेळ आली आहे”, असे राज ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरेंनी जनतेशी संवाद साधताना चौफेर टोलेबाजी करत विविध मुद्द्यांवर लक्ष घातलं..साडेतीन मुहुर्तापैकी एक, या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. दसरा म्हटलं की, सोनं लुटणं आलं, असे आपण म्हणतो. दरवर्षी आपण तेच करत आलो. पण महाराष्ट्राचं सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे. आणि आम्ही फक्त आपट्याचं पानं एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याचं पानं सोडून दुसरं काही राहत नाही. बाकीचे सर्व सोनं लुटून चाललं आहे. पण आमचं दुर्लक्ष. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात, तर कधी जातीपातीत मशगुल! आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी?” असे त्यांनी म्हटले आहे..
दरम्यान जातीपातीच्या राजकारण गुंतून ठेवून महाराष्ट्राला ओरबडणाऱ्यांना धडा शिकवण्याची संधी आहे. मतांची प्रतारणा करणाऱ्यांना जाब विचारण्याची संधी आहे, असे सांगून झाडावर ठेवलेली शस्त्र उतरण्याची हीच योग्य वेळ आहे, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं. विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंच्या गर्जनेने संपूर्ण जनतेचे लक्ष वेधून घेतल आहे..