राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.. अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी काँग्रेसकडून त्यांना डावलले जात असल्यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे..
विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी म्हटलं आहे की, मला काँग्रेसमध्ये सातत्याने डावललं गेलं,मला काँग्रेसच्या बैठकीत बोलावलं जात नाही,मी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माझे फोन घेतले नाही.त्यांनी मला उत्तर दिलं नाही, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी विरोधी पक्षाची आमदार असून देखील मला विकास कामासाठी मदत केली, तसेच निधी दिला
त्यामुळे ते 13 तारखेला अमरावती असल्याने त्यांचा सत्कार मी करत आहे. मला काँग्रेस मध्ये सातत्याने डावललं गेलं,मला काँग्रेसच्या बैठकीत बोलावलं जात नाही, मी पाच वर्षे पासून काँग्रेसचे आमदार आहे, मात्र वारंवार मला काँग्रेसमध्ये डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश करनार असल्याच्या जोरदार चर्चा आहे. त्यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया देत आपलं म्हणणं मांडले आहे. महत्वाचे म्हणजे काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी शहरात अजित पवारांच्या स्वागताचे मोठे होर्डिंग बॅनर लावलेले आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.