राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर होत असलेल्या राज्यातील 4 दसरा मेळाव्यांकडे महाराष्ट्रातील जनेतेचं लक्ष लागून राहील होतं. या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला.. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी
राज्यात आपली सत्ता आल्यास प्रत्येक जिल्ह्यात आपण शिवाजी महाराजांची मंदिरं बांधणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, प्रभू श्रीरामांची जशी मंदिरं आहेत, तसेच आमच्या शिवरायांची (Shivaji maharaj) मंदिरं बांधण्यात येतील, अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली..
यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेतील फुटीवर बोलताना, शेवटी आपलं कोणी नसतं, आपल्यासोबत जो उभा आहे तो आपला आणि आपल्याविरुद्ध लढायला जो उभा आहे तो आपला नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच शिकवण दिलीय, स्वराज्यावर चालून आला तो आपला शत्रू. स्वराज्यावर चालून आलेल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा वध केला नसता, तर आज आपण कुणीही नसतो. मात्र, भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, 8 महिन्यात पुतळा कोसळला. मी वचन देतो, आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, कारण शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे.असे त्यांनी म्हटले..
दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महायुती सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनीही हिंदुत्त्व, शिवरायांचा पुतळा, संरसंघचालक, गोरक्षक यांसह विविध मुद्द्यांवरुन भाजप व महायुती सरकारला लक्ष्य केलं.
दरम्यान ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. हे दैवत आपलं आहे, आपण नाही पुजायचं, मग कोणी पुजायचं. जो शिवाजी महाराजांच्या मंदिराला विरोध करेल, त्याला माझा महाराष्ट्र बघून घेईल, असेही उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून म्हटले.