राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा उत्साही वातावरणात पार पडला. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच युवा नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत सर्वांचें लक्ष वेधून घेतले.गेल्या अडीच वर्षांच्या काळात आणि म्हणोन… आणि म्हणोन… शर्ट खाली खेचत कोणीतरी भाषण करते असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची मिमिक्री करत आदित्य ठाकरेंनी खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे यांनी, ‘…आणि म्हणोन, आणि म्हणोन…’ बोलत राज्यात धार्मिक आणि जातीय दंगली करत लोकांना व्यग्र ठेवले, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून बोलताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला..हे सरकार रोज खोके खात आहे, भ्रष्टाचार करत आहे. मुंबईत 6000 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा झाला आहे.शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश या सगळ्यात भ्रष्टाचार केला. शिंदे सरकार जेव्हा दावोसला गेले तेव्हा चार दिवसांत 45 कोटी रुपये उडवून आले. आम्ही दाव्होस आर्थिक परिषदेला गेलो होतो तेव्हा महाराष्ट्रात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुती सरकार घोषणांचा पाऊस पडत आहे.. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला. हे सरकार सध्या हजारो निर्णय घेत आहे.. पण मला एका अधिकाऱ्याने सांगितले की, जोपर्यंत अदानीचे सर्व जीआर निघणार नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.