राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चे भजनी सुरू झाले असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही ॲक्टिव मोडवर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुकले असून स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.. तसेच विधानसभेनंतर मनसे हा सत्तेत असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
आगामी विधानसभेेला सत्ताधाऱ्यांकडून घोषणांचा पाऊस पडला जात आहे.. काही दिवसांनी पैसे वाटले जातील ते पैसे घ्या कारण ते पैसे जनतेचे तुमचेच आहेत.. आणि मनसेला निवडून द्या असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.. या निवडणुकीत ना युती ना आघाडी. आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. मी तुम्हाला सांगतो की निवडणुकांनंतर मनसे सत्तेतला पक्ष असेल, निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू. या महाराष्ट्राची धुरा एकदा माझ्या हातात द्या. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे आवाहनही यावेळी राज ठाकरे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीनंतर आमच्या हातात एकदा सत्ता आली की कोणीही कितीही करू दे, महाराष्ट्र कधी झुकणार नाही अदानी येतो विमानतळे, जागा घेतो. माझ्या कोकणात राहणाऱ्यांना मी सांगतो, गुजरातमध्ये शेतीची जमीन विकत शकत नाही पण विकायची असेल तर शेतकऱ्यांना विकू शकतात हा कायदा आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.”हातात सत्ता देऊन पाहा एक ही तरुण तरुणी कामाशिवाय रहाणार नाही. प्रत्येक जण आपल्या माणसांचा विचार करतो. तुम्हाला उध्वस्त करायचे आहे सगळ्यांचे डोळे महाराष्ट्राकडे लागले आहे.. असेही राज ठाकरे म्हणाले..दरम्यानआगामी निवडणुकीत मनसे बाजी मारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.