राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीसह महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालावरुन महायुतीने विधानसभेसाठी जोरात तयारी सुरु केली आहे
कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजण्याची शक्यता आहे.. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दलची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी चर्चा रंगली आहे.
लोकसभेत मिळालेल्या फटक्यानंतर महायुती जोमाने कामाला लागली असून दौऱ्यांचा धडाका लावला जात आहे.. तर महाविकास आघाडी ही अधिक ॲक्शन मोडवर आली असून जोमाने मैदानात उतरली आहे.., दरम्यान सर्वच राजकीय पक्षांची निवडणुकीसाठी लगबग सुरू असून आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे… या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद किती वाजता होईल याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागले आहे..दरम्यान ही या महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे बोललं जात आहे. यामुळे आज मंत्रालयाबाहेर अनेक लोकांनी गर्दी केली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामं मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात गर्दी पहायला मिळत आहे..