राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल केव्हाही वाजू शकत, असे असताना आज महायुतीच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. वाशी, ऐरोली, मुलुंड,दहिसर आणि ठाणे येथील टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्रीपासूनच टोलमाफीचा आदेश देण्यात आलाय. विधानसभेच्या तोंडवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. दररोज साधारण सहा लाख वाहना मुंबईत येजा करीत असतात मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळातील निर्णयामुळे लाखो वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे.. दरम्यान जड वाहन सोडून इतर हलक्या वाहनांना टोल मधून सूट देण्यात आली आहे.
राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याआधी राज्यात निर्णायांचा सपाटा सुरु आहे. आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सरकारसाठी महत्वाची आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी अनेक निर्णय आज सरकार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मुंबईतील पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
महायुती सरकारची आजची शेवटची कॅबिनेट बैठक असून आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर येणा-या २४ तासात कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी माहिती वरीष्ठ प्रशासकीय सूत्रांने दिली आहे