राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. महाराष्ट्रात कधीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात मात्र या आधीच भाजपने उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या सूत्रांंकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 150 ते 160 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसमोर उमेदवारांचे संपूर्ण सादरीकरण करणार आहेत. यानंतर भाजपची पहिली यादी जवळपास अंतिम होण्याची शक्यता आहे.
राज्य विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.. महायुती बरोबर महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप 150-160, शिवसेना 80 ते 90 आणि राष्ट्रवादी 40-50 जागांवर निवडणूक लढवणार आहे. काही जागांवर एकमत होऊ शकले नसले तरी पुढील बैठकीत याबाबतची चर्चा निश्चित होऊ शकते. अशा जागांची संख्या सुमारे 47 आहे. या जागांवर कोणता पक्ष कुठून लढवायचा याबाबत संभ्रम आहे.
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटकेनंतर भाजप ॲक्टिव्ह मोडमध्ये आली असून निवडणुकीपूर्वीच तिकीट वाटपात रस्सी खेच करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक विधानसभेसाठी समन्वयकांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान दुसरीकडे तिसऱ्या आघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे..तिसऱ्या आघाडीमध्ये संभाजी राजे छत्रपती माजी खासदार राजू शेट्टी आमदार बच्चू कडू यांच्यासह आधी काही नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे..