राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते अशातच आता महायुतीत परभणीच्या जागेवरून ठिणगी पडली आहे..परभणी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली.. या बैठकीत दरम्यान परभणी विधानसभेची जागा मित्र पक्षाला न सोडता भाजपला सोडण्यात यावी आणि पाथरीची जागा भाजप ऐवजी शिवसेनेला सोडण्यात यावी, अशी मागणी परभणीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय जर असं झालं नाही तर भाजपचे पदाधिकारी शिवसेना असो की राष्ट्रवादी यांचे काम करणार नसल्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडं सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मात्र काही मतदारसंघातील जागावरून महायुती ठिणगी पडली आहे.. एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार घोषणांचा पाऊस पाडत आहे तर परभणी विधानसभेच्या जागावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचा दिसून येत आहे.
विधानसभेच्या तोंडावर महायुतीतील वाद हा परभणीतील जागेवरून दिसून आला आहे. या संदर्भात झालेल्या या बैठकीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नेतेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये पाथरी विधानसभेची भाजपची जागा ही शिवसेनेला सोडण्यात यावी आणि परभणीची जागा ही शिवसेनेऐवजी भाजपला सोडण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली..आता महायुतीतील वरिष्ठ नेते यावर काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास तसेच वरिष्ठ नेत्यांना भेटूनही त्यांच्यासमोर ही मागणी करणार असल्याचेही या नेत्यांनी ठरवले आहे. त्यामुळे आता शिवसेनेची काय भूमिका ठरते? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.