राजमुद्रा : जळगाव जिल्ह्यातच मोठ्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा शासकीय नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया आज पार पडली. यापूर्वीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आजही फेर निवडणूक पार पडली. यामध्ये सहकार गटाचे अजबसिंग पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत प्रगती गटाचे अमरसिंग पवार यांची निवड झाली.
गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आज पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी सहकार गटाचे अजबसिंग पाटील यांची बिनविरोध तर उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रगती गटाचे अमरसिंग पवार हे विजयी झाल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्ष तसेच अध्यक्ष यांचा संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर संचालकांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात नाचून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा प्रचंड जल्लोष करण्यात आला.
सहकार गट लोकसहकार गट तसेच प्रगती गट अशा तीनही गटांच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असा विश्वास यावेळी अध्यक्ष अजब सिंग पाटील व उपाध्यक्ष अमरसिंग पवार यांनी बोलताना व्यक्त केला आहे. निवड झाल्याबद्दल सांगताना अध्यक्ष अजबसिंग पाटील यांचे डोळे पाणावले होते.