राजमुद्रा : जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको शिवारात दीक्षाभूमी स्मारकाच्या उभारणी व्हावी यासाठी समता सैनिक दलाच्या वतीने महानगरपालिकेपुढे धरणे आंदोलन करण्यात आले..
पिंपळा खुडको शिवारात सव्वा एकर जागेमध्ये दीक्षाभूमीच्या उभारणीसाठी नगरपालिकेतर्फे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आहे त्यानंतर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेने सुद्धा या ठिकाणी दीक्षाभूमी बांधकामासाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे याच ठिकाणी दीक्षाभूमी स्मारकाचा विषय मार्गी लावावा या मागणीसाठी समता सैनिक दलाच्या वतीने महापालिकेसमोर महापालिकेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात येऊन महापालिकेच्या निषेध व्यक्त करण्यात आले. यावेळी राज्य संघटक समता सैनिक दलाचे विजय निकम सह सर्वजण उपस्थित होते.