राजमुद्रा : जळगाव जिल्ह्यातील देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसला ऑगस्ट महिन्यात नेपाळकडे जाताना भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघातानंतर राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली होती.. त्यांच्या या घोषणेनुसार मृतांच्या कुटुंबियांना मदत मिळवण्यासाठी त्यांची परिपूर्ण माहिती भरलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणे आवश्यक होते मात्र अपूर्ण माहिती अभावी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दाखल झालेले प्रस्ताव रखडली असल्याची माहिती समोर आली आहे… त्यामुळे मयतांच्या वारसांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे..
या प्रस्तावामध्ये घटनास्थळ पंचनामा प्रत शोविच्छेदन अहवाल प्रत तहसीलदारांचा अभिप्राय तसेच विमा काढला होता का अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे का अशा एकूण वीस मुद्द्यावरील माहिती प्रस्तावासोबत द्यायची होती मात्र यातील माहिती परिपूर्ण नसल्याने प्राप्त्या अभ्यासतील त्रुटी दूर करून ते पुन्हा सादर करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार कार्यालयाला कळविण्यात आले आहेत.. अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाले आहे.. त्यामुळे आता 25 मैतांच्या च्या वारसांना सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे..
या घटनेबाबत राजू सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप मिळाली नसून निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी ती मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.. त्यांच्याकडून मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून मदत मिळाली.. मात्र आता या माहिती अभावी नेपाळग्रस्त दुर्घटनांचे प्रस्ताव रखडले आहेत.