राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचें लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा डाव टाकत अजित पवार यांना धक्क्यावर धक्के दिले आहेत.. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांची भेट घेतली. असून ते लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत… तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील नुकतंच शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत.त्यामुळे ते लवकरच तुतारी हाती घेणारे यामुळे अजित पवारांना विधानसभेच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या भेटीनंतर ती आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने त्यांच्या भूमीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.आधी मी शरद पवारांची चर्चा करतो, असं ते म्हणाले. मी अजित दादांवर नाराज नाही. साहेबांना भेटणं हे भाग्य आहे. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी आलोय, असंही उमेश पाटील म्हणाले.काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून राजेंद्र शिंगणे यांनी प्रवास केला होता.त्यावेळी त्यांनी आपला चेहरा फाईलने झाकला होता.. आता त्यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीमुळे शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याचं कळतं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात आणि पिंजून काढला आहे.. त्याचबरोबर राष्ट्रवादीत बंड करून महायुतीला गेलेल्या अजित पवारांचा एक एक पत्ता कट करण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.. लोकसभेतील यशानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात येणाऱ्यांची संख्या वाढत चालली असून याचा अधिक फटका अजित पवार गटाला बसला आहे. दरम्यान आज दुपारीच विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे.. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.