राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच आता राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी पार पडला..महाराष्ट्राच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी विधीमंडळात जोरदार तयारी करण्यात आली होती. उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीकडून इंद्रीस नायकवाडी, पंकज भुजबळ यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी देण्यात आली आहे. नुकताच या सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली.
राज्यतील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती मोठी खेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली.. त्यानंतर आज त्यांनी शपथ घेतली..