राजमुद्रा : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात होते. अशातच आजपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. दुपारी साडेतीन वाजल्यापासून ही आचारसंहिता सुरु होणार असून निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत्या माध्यमातून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग सण उत्सवांचा विचार करून तारखा जाहीर करणार आहे. 29 ऑक्टोबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीचा सण आहे. तर 6 नोव्हेंबरपर्यंत छठपूजा साजरी केली जाणार आहे. तसच देव दिवाळीही नोव्हेंबर महिन्यातच आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी निवडणुकीच्या तारखा घोषित करू शकतं.