राजमुद्रा :केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज (मंगळवार, १५ ऑकटोबर) नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पार पडत आहे. महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत हि पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.29 ऑक्टोबरपासून दिवाळीचा उत्सव आहे. 8 नोव्हेंबरला छठपूजा असल्याने मतदान त्यानंतरच होईल. महाराष्ट्रात दोन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचं रणशिंग फुकलं असून यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत असल्याने दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.